स्वराज्य निर्माता
स्वराज्य निर्माता
1 min
470
स्वराज्य निर्माता
असा एक झाला
प्रजेच्या हिताची
जाण होती त्याला
गड किल्ले सारे
जतन करून
स्वराज्य गुढी ती
दावी उभारून
शेतकरी राजा
कैवारी तो त्यांचा
अज्ञापत्र असे
पुरावा तयाचा
संत तुकाराम
होते गुरूस्थानी
शिकवण अशी
अंगी आचरणी
जाणता तो राजा
शिवराय माझा
छत्रपती त्यांना
मुजरा हा माझा
