स्वप्न
स्वप्न
1 min
660
जादूची चटई
सापडली मला.
गुपचुप रात्री
अंथरले तिला.
बसुनि तीवर
गेले फिरायला.
उंच आकाशात
मिळे उडायला.
मऊ गार स्पर्श
ढगांनाही केला.
चांदण्यांशी जरा
खेळही रंगला.
चंदामामा मात्र
दुरुन पाहिला.
कळले न मला
वेळ कसा गेला.
परतुनि आले
लगेच घराला.
सकाळी ओ दिली
आईच्या हाकेला
स्वप्न होते मग
समजले मला.
