स्वप्न साकारले
स्वप्न साकारले
1 min
419
संगीत शिक्षणाचा मी
घेतला मनापासून ध्यास
क्लासच्या वेळेचे बसवले
वेळापत्रक खास
ओफिसनंतर , शनिवारी
नाही कंटाळा केला
रियाझासाठी वेळ
राखूनच ठेवला
लढून , झगडून थोडेफार
वाजवायला शिकले
सरांचे अनंत उपकार
कायम मनात ठेवले
रुग्णांसाठी कार्यक्रम करताना
कष्ट सार्थकी लागले
अन् त्या दिवशी वाटले
स्वप्न साकार झाले
