स्वप्न माझे बहरून यावे
स्वप्न माझे बहरून यावे




फुलांना पाहता पाहता
स्वप्न माझे बहरून यावे
ओजंळीत दरवळणार्या
सुगंधात मी न्हाऊन जावे
तुझ्या हास्यात मिसळूनी
स्वप्न माझे बहरून यावे
खुलताना खळी गालावर
रूपडे माझे हरखून जावे
कोवळी किरणे झेलताना
स्वप्न माझे बहरून यावे
नव्या आकांक्षाना लावून पंख
क्षितिजाला मी स्पर्शण्या जावे
कुशीत तुझ्या शिरताना
स्वप्न माझे बहरून यावे
नात्यातल्या मोकळ्या श्वासाने
मला जगणे शिकवून जावे