STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

स्वामी दर्शन द्या राया

स्वामी दर्शन द्या राया

1 min
496

दर्शन द्यावे स्वामी समर्था,

धरा भक्तावर छाया।

धरा भक्तावर छाया।।


सदा असावी तुमची,

या भक्तांवर माया,

स्वामी दर्शन द्या राया।।


कर्दळीवनात बाबा, 

कोणी प्रकटले संत।

कोणी प्रकटले संत|

वटवृक्षाखाली उभा,

दोन्ही कमरेवर हात।।

दोन्ही कमरेवर हात

जणू वाटे पंढरीचा राया।


सदा असावी तुमची,

या भक्तांवर माया,

स्वामी दर्शन द्या राया।।१।।


समर्थांच्या जागी,

कोणी दत्तगुरू पाहिले।।

कोणी दत्तगुरू पाहिले।।

अक्कलकोटी बाबांनी,

भक्ता चमत्कार दाविले|

चमत्कार दाविला म्हणूनी आलो हो भेटाया।।

सदा असावी तुमची,

या भक्तांवर माया,

स्वामी दर्शन द्या राया।।२।।


Rate this content
Log in