स्वागत नववर्षाचे
स्वागत नववर्षाचे
वाट पाहती नववर्षाची
आशा पालवली मनीची
आरोग्य जपा मंत्र भावला
चला नववर्षाच्या स्वागताला
नव्या आशा आकांक्षा
मनी सा-यांच्या फुलती
नववर्ष आरोग्यदायी
कोरोनाची हकालपट्टी
पर्यटना जन आसुसले
साद निसर्ग घालतसे
खुला निसर्ग वेड लावे
ओढ प्रवासाची लागतसे
अतिथींचा सन्मान करुया
गप्पागोष्टी चेष्टामस्करी
मित्रमैत्रिणी , नातेवाईक
हास्य विनोदांची कारंजी
शाळा अभ्यास सुरु होता
मुलांचीही कळी खुले
सखेसोबती शाळा गप्पा
हसरे बालपण उमले
भिती गायब कोरोनाची
सुखी सारी जनता असो
सर्व काही सुरळीत होवो
देशामधी आलबेल असो
नवीन वर्षी असा भारत
आहे स्वप्न जनतेचे
पूर्ण होवो मनोकामना
प्रार्थिते मी परमेशाते
