स्वागत 2019...!
स्वागत 2019...!
स्वागत 2019 चे...!
जा हले गेले विसरून जावू
फे र धरूया नव्या मैत्रीचा
मा ज नमाज बाजूस सारून
ए कोपा राखुया जीवनाचा
मे ले कित्येक गर्वा पायी
जू ने लेऊन अंगावरी
जु लमी विचारधारा घेऊन
ऑ ल आऊट झाले कितीतरी
स रसकट सारे मानव आपण
ऑ ल टुगेदर ऑल वन
नो टेन्शन नो वरी
डि समूड झाला तरी म्हणू हरी हरी...!
जानेवारीचा जा घेऊन
फेब्रुवरीला फे ने बोलाविला
मार्च साठी मा मागून आणूनी
एक एप्रिल फुल त्यात मिळवला
मे जून झाले महिने पाच म्हणुनी
जु नही त्यात सहावा घुसवला
जु लै मधला जु ओढूनी
ऑ गष्टला त्यात मी बांधला
स प्टेंबरचा स जोडूनी
ऑ क्टोम्बर त्यात मिसळला
नो व्हेंबरची कथा वेगळी म्हणुनी
डि सेंम्बरला डीवचूनी डी घेतला
असा अद्याक्षरांचा मेळ घालुनी
कवितेचा घाट वेगळा घातला
पहा कसा मस्त मेळ जमला
नववर्षाचा आनंद साजरा करण्या आगळा
शुभेच्छा देण्यासाठी हा काव्य सुमनांचा
मुद्दामूनच गुच्छ पाठवला वेगळा सगळा....!
नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
नित्य सुप्रभात...!
