स्वाभिमान
स्वाभिमान
जगताना आयुष्यात कधी,
झुकू न द्यावी आपली मान,
मरण आले तर बेहत्तर,
पण जोपासावा स्वाभिमान
निर्माण करावी स्वताची वाट,
मार्ग अवलंबावा खरा,
गर्दित श्वानांच्या चालण्यापेक्षा,
सोबत एकच वाघ बरा
जाणे नको त्या ठिकाणी,
होईल जिथे अपमान,
मार्ग तो स्विकारू नये,
जिथे व्हावे लागेल बेईमान
श्रीमंताचा महाल नको,
जर नसेल तिथे माणुसकी,
गरिबाची झोपडी बरी,
असते तिथे आपुलकी
शब्द असावे गोड मधुर,
मनाला भिडणारे,
नको ते इतके कठोर,
काळीज फाडून काढणारे
नाते जोडावे असे,
संकटातही साथ देणारे,
हद्दपार करावे ते चेहरे,
मागून घाव करणारे
जगणे नाही जीवन असे,
काळानेही करावे भाष्य,
मरणाच्या मिठीत देखील,
चेहऱ्यावर असावे स्मित हास्य
