STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

सूर्या

सूर्या

1 min
991



किती तारकांना जळवशील सूर्या

हजारो झळा तीज भरवशील सूर्या...


सकाळी लवकरी उठवशील सूर्या

जिवांना लवकरी उठवशील सूर्या ?....!


नभी चांदण्यांचे किती प्रेम आहे

जरा तूच त्यांना हसवशील सुर्या ?...!


फुले पाकळ्या वाट बघती तुझी रे

तु येरे लवकरी तळपशील सूर्या....!


जरी रोज देतो शिकवनी जगाला

वसंतात धरणी तळपशील सूर्या...


कराया निघाला भले माणसाचे

कसा तू तमाला हरवशील सूर्या ?....!


पहाटे पहाटे असा उगवतो पण

जरा काळ आभा बदलशील सूर्या ?...!


तुझ्या या गुणाला सदा ठेव गगनी

धरेला तजेला भरवशील सुर्या ?....!


निरोगीच काया तुझी देण आहे

किरण सत्वानी जगवशील सूर्या ?.....!


किती पाप संचारले भोवताली

तयांचा अलाव जळवशील सूर्या ?....!


दरारा तुझा दावजो दानवांना

तयांना कधी तू रडवशील सूर्या ?..!


तुला मानले इश आता मनाने

भुलोकास आशीष देशील सूर्या....!


Rate this content
Log in