सूर्य तापला .......
सूर्य तापला .......
1 min
270
१) सूर्य तापला,
वन्यजीव संपला,
वसुंधरेचा।।
२) सूर्य तापला,
जणू म्हणे धरेला,
जाळीतो तुला ।।
३)तापला सूर्य,
मनी भंगले धैर्य,
हिरवाईचे ।।
४) सूर्य तापला,
तेजोमय की झाला,
वलयांकित ।।
५)तापला सूर्य,
पाहता त्याचे क्रोर्य,
हो भस्मसात ।।
६)सूर्य तापला,
वणवाच पेटला,
जंगलातील ।।
७)सूर्य तापला,
डोईवर बसला,
तिरमिरला ।।
८)सूर्य तापला,
हवाहवासा झाला,
थंड मोसमी ।।
९)सूर्य तापला,
कुपोषिताचा झाला,
जीवन दाता ।।
१०) सूर्य तापला,
सुसंवाद संपला,
स्रोत थांबला ।।
