सुट्टीचे दिवस
सुट्टीचे दिवस
1 min
193
सुट्टीचे ते दिवस येता
मुले करती गडबड फार
आनंदाने उड्या घेता
मोठ्यांचा खाती मार
रात्रंदिवस हैराण करती
इकडे तिकडे फेऱ्या मारती
खेळून खेळून हैराण होती
घरभर गलका सारे करती
अंगणभर खेळ खेळती
एकमेकांच्या खोड्या काढती
चिडवून चिडवून राग काढती
एकमेकांवर आरोप करती
गट्टी होता मजा करती
कट्टी होता सजा देती
मार खाऊन नाराज होती
एकमेकांना दोष देती
रोज चाले त्यांची मस्ती
मुले सारी दंगा करती
अशी मुलांची दंगामस्ती
उद्याची प्रतीक्षा करती
