STORYMIRROR

Venu Kurjekar

Others Children

3  

Venu Kurjekar

Others Children

सुट्टी लागली शाळेला

सुट्टी लागली शाळेला

1 min
197

सुट्टी लागली शाळेला.

चला पळू या खेळायला. ......


खेळ खेळू मौजेचे.

व्यायाम आणि बुद्धीचे. .......


खेळू आता पकडा पकडी

आपडी थापडी, गुळाची पापडी. ......


क्रिकेट ही खेळू भारी.

पोहण्याची गंमत न्यारी. ......


आईला करु मदत थोडी .

कधी सोडवू गंमत कोडी. .....


मैत्री करु रंगाशी.

सुरेख चित्र हाताशी. .......


वाचू पुस्तके छान छान.

विसरून जाऊ वेळेचे भान. .......


निरखू आता झाडे, पक्षी.

अन् चंद्र चांदण्या आकाशी. ......


लोळू खेळू करु धमाल.

सुट्टी मोठी असते कमाल . .......



Rate this content
Log in