STORYMIRROR

Dipaali Pralhad

Others

3  

Dipaali Pralhad

Others

सुतक

सुतक

1 min
28.2K


पहिल्यांदाच मी इतके

निवांत डोळे मिटले होते

बाकी सर्व जागी जे होते ,

सख्खे चुलत मित्र मैत्रिणी

सगेसोयरे , नातलग

सर्वच शब्दांचे गोड होते


ऊठ ऊठ म्हणत मला

रडून रडून उठवत होते

अन मी सुटकेचा दुःखद

पण सुखदसा श्वास सोडून

निपचित भुईधार होते


अरे किती वेळ असे

मला धरून बसणार

वेशी बाहेरच्या त्या चौकटीत

मला सोडून यावंच लागणार


रडता रडता बोलत होते

माझं कोडकौतुक हंबरडा

फोडून शब्दात गात होते


जिवंतपणी आस होती

दोन मायेच्या शब्दांची

तेव्हाच दिले असते प्रेम

तर आज डोळ्यात यांच्या

दाटून आल्या नसत्या

घळाघळा धारा आसवांच्या


कुणाचा तरी आवाज आला

तयारी करावी लागेल

मीही समजले होते कि

जित्यापणी जीव जळाला होता

आता फक्तच नश्वर देह राख होईल


बारा तेरा दिवसाचं सुतक पाळतील

माझ्या आवडीनिवडी कटाक्षानं पाळतील

आणि आता हयात नसलेल्या माझ्या

जिवाच्या साऱ्याच हौस पुरवतील.


Rate this content
Log in