सुनसान रस्ता
सुनसान रस्ता


रखरखते ऊन आणि निर्मनुष्य रस्ता,
का आज माणसाला माणूस झाला पोरका?
गुदमरला होता का इथे श्वास ही रस्त्याचा?
जीव ही कोंडला होता का पाना फुलांचा?
शांत निवांत हा वारा हळुवार धावत आहे,
पशु पक्षाना जणू निवांतपणाच मिळाला आहे.
जो तो घरात आपलं जग शोधत आहे.
रस्ता मात्र माणसा विना ओकाबोका दिसत आहे
सारे काही लुप्त झाले ,निर्विकार झाले.
पक्ष्यांचे मात्र मंजुळ गीत ऐकू येऊ लागले.
एकाच बिदु पाशी जणू सारे जग थांबले.
घराघरातुन मात्र सवांद वाहू लागले.
माणसा पासून माणूस आज दूर दूर राहू लागला.
ओळख असून सुद्धा अंतर ठेवून वागू लागला.
तुला अस निवांत बघून हे रसत्या चुकल्या चुकल्या सारख वाटत.
तुझ्यावर धावणाऱ्या गाडया, माणसे बघूनच जग जिवंत भासत.