STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

सुख

सुख

1 min
384

अगदी बरसणं कठीण त्याचं, जरी सरी सरींनी

खेचून आणलय सुखाला, मी माझ्या परीनी


एक एक कवडसा,अलगद पकडून ओंजळीत

जपलय मी त्याला,ऊबदार स्पर्शाने गोंजारीत


ठेवलंय जपून मी ,त्याला मनाच्या कोंदणात

फुलतेय हळूहळू ते,जीवनाच्या क्षणा क्षणात


येऊ का ग मी जरा,इथून तिथून फिरून?

झालं असं कित्येकदा, त्याचं मला विचारून


थांबवते मी प्रत्येकवेळी,त्याला नवा बहाणा देऊन

थोपवलं मी त्याला, अगतिकतेच्या बंधनात ठेऊन


पण किती दिवस थोपवेल?,मी त्याचं असं जाणं

रोज रोजच्या बहण्यांच, ऐकवू किती रडगाणं


शेवटी मीच आज स्वीकारलं,ब्रीद नव्या जाणिवांचं

स्वतःच त्या सुखाला घेऊन ,सगळ्यांकडे जायचं


Rate this content
Log in