STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं

1 min
614

सुख म्हणजे जन्मजात बाळाचा

कोमल स्पर्श अनुभवण असतं...


सुख म्हणजे बाळाच्या अनेक

लीला नजरेत साठवण असतं....


सुख म्हणजे आईच्या प्रेमळ

पदराआड लपणं असतं....


सुख म्हणजे बाबांच्या धाकात

अन् शिस्तीत वाढणं असतं....


सुख म्हणजे आजी आजोबांच्या

गोष्टीत रममाण होणं असतं....


सुख म्हणजे शाळेत बाईंच्या समवेत

अभ्यासात रंगून जाण असतं...


सुख म्हणजे चार मित्रमैत्रिणीसोबत

मौज मजा मस्ती आनंदी जीवन असतं....


सुख म्हणजे दीन बंधूंवर 

मनापासून प्रेम करण असतं....


सुख म्हणजे कुटुंबातील व्यक्तींचा

आदर सन्मान करण असतं.....


Rate this content
Log in