STORYMIRROR

Shila Ambhure

Others

5.0  

Shila Ambhure

Others

सुजाण ग्राहक

सुजाण ग्राहक

1 min
1.0K



गरज काळाची

बना ग्राहक सुजाण

नको अजाण

बेसावध.


मुदत मालाची

घ्यावी तपासून नीट

नको किटकिट

मागाहुन.


टाळून प्लास्टिक

वापरावी कापडी पिशवी

दामही वाजवी

द्यावे.


जिन्नस सारा

घ्यावा तोलून, मापून

तागडी निरखून

पहावी.


होता फसवणूक

घ्यावी ग्राहकमंचाकडे धाव

योग्य भाव

मिळवाया.


साहित्याला गुण द्या
लॉग इन