STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*सुगंधाचं दान*

*सुगंधाचं दान*

1 min
15.3K



सुगंधाचं दान

बकुळीने दिलं

छोटंस फूल

पानात लपलं॥१॥


सुगंधाचं दान

गुलाबानं दिलं

सुगंधीत गुलाबाला

देवाला वाहिलं॥२॥


सुगंधाचं दान

मोगर्‍यान दिलं

त्या सुवासाला

ह्रदयात जपलं॥३॥


सुगंधाचं दान

केवड्यान दिलं

रमान ते

गणपतीला वाहिलं॥४॥


सुगंधाचं दान

जाईनं दिलं

सांज होताच

कोमेजून गेलं॥५॥


सुगंधाचं दान

मातीनं दिलं

धरणी मातेला

पावसानं हसवलं॥६॥


सुगंधाचं दान

कष्टानं दिलं

कष्टाच्या जोरावर

नशीब फुलवलं॥७॥


सुगंधाचं दान

अत्तरानं दिलं

मनोमन मला

खूपच भावलं॥८॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन