सुगी गीत
सुगी गीत
रूपेरी चांदण्यात दिन सुगीचे आलेया
वाड्या वस्त्या उजळती फेर धरूनी नाचुया।।धृ।।
माय अशी फुलोरली ओंब्या वाकून झुलती
हुरडा गाऊ संगतीनं सुगी गीत गाती
चिंता नग रे कसली हिरवं सपान पाहूया
वाड्यावस्त्या उजळती फेर धरूनी नाचूया ।।१।।
मळलेल्या दाण्याला वारे देते सजनी
खळं भरलं कणसानं आता करूया झोडणी
ज्वारी,बाजरी,जोंधळा पिकं जोमानं आलया
वाड्यावस्त्या उजळती फेर धरूनी नाचूया।।२।।
काळ्या आईचे रूप हिरव्या शालूने नटले
लाडक्या या सजणीच्या गळा शोभे डोरले
आला खुशीचा ह्यो दिन लेझीम खेळूया
वाड्यावस्त्या उजळती फेर धरूनी नाचूया।।३।।
