सुधीर फडके जयंती...!
सुधीर फडके जयंती...!
सुधीर फडके जयंती मनोभावे अभिवादन ..!!
सु गम संगीताची कोकीळ कंठी
धी रोदात्त सुरावट ही
र मणीय मनोहर सात्विक होउनी
फ डकली अन गगन भेदी ठरली
ड रकाळीच्या कम्पनाने आसमंत
कें व्हाच भारून टाकले जे
ज न माणसांनी प्रेमांनी हृदयी साठविले
यं त्र जणू हे मधुर सुरवटीचे
ति मिरात दुमदुमले
म ला वाटते हा कपिलाशष्टीचा योग म्हणावा
नो नो म्हणणारी जोडी एस म्हणून गाजली
भा व गीतांची सुमधुर अशा अन
वे गळ्या अलौकिक रामायणाची
निर्मिती झाली
अ सतील अनेक जगती पण
भी क कोणासही या जोडीने घातली नाही
वा द गाजवले क्षणोक्षणी पण
द मदार साथ कधी सोडली नाही
न तमस्तक म्हणुनी व्हावे खरोखर
आशा दिगग्ज सुधीरजी आणि
गदीमांच्या समोर....
जयंती बाबूजींची असली तरी
गदिमांचे त्यास कोंदण हवे
म्हणून बाबूजींच्या छबीचे मोल जाणण्या
गदिमांचे काळीज हवे....!!!
