STORYMIRROR

Mina Shelke

Others

2  

Mina Shelke

Others

सुधाकरी रचना

सुधाकरी रचना

1 min
484



नशेची ती लत । घालविते पत

कुत्र्यावानी गत । माणसाची


वाया गेली मती । संसाराची माती

झाली अधोगती । जीवनाची


एकच तो घोट । लागताचं ओठी

बुद्धी होई नाठी । कायमची


जोखीम रे मोठी । शरीराची हानी

सांगितली कुणी । करावया


खोटेच बहाणे । खोटेचं दाखले

जिभेचे चोचले । पुरवाया


तुझ्या अवस्थेला । तूचं रे कारण

नकोचं तारण । कुणा धरू


तोल ढासळतो। मित्रांच्या संगती

धरी कुसंगती । अपरात्री


संसाराची दशा । जनी होई हशा

घोंगावती माशा । गलिच्छासी


जैसे ज्याचे कर्म । तैसे त्यासी फळ

होई पानगळ । अवेळीचं


व्यर्थची तो जन्म । नशेचा लाचार

संपला विचार । भलाबुरा


व्यसन विळखा । विसर देहाचा

नाश मानवाचा । ठरलेला


Rate this content
Log in