सत्यधर्म ( अभंग रचना )
सत्यधर्म ( अभंग रचना )
1 min
11.7K
वरातीत बोले | शुद्र तू असशी |
बरोबरी कशी ? I ब्राम्हणांशी ॥ १ ॥
वाची धर्मग्रंथ I हासले स्वतःला I
लबाडपणाला | धर्मातील ॥ २ ॥
समाधी शोधली | ती शिवरायांची I
मान अस्मितेची I उंचावली ॥ ३ ॥
दहा दिवसांची I ती शिवजयंती |
साजरी करती | घरोघरी ॥ ४ ॥
सर्व जनतेस I पाणवठा खुला I
शिक्षणाचा दिला | गुरू मंत्र ॥ ५ ॥
सत्यधर्म नवा | लोक मानतात |
महात्मा करीत | ज्योतीबाला ॥ ६ ॥
