स्टेथस्कोप
स्टेथस्कोप

1 min

11.9K
लहानपणी डॉक्टर, डॉक्टर खेळताना
स्टेथस्कोपचे खूप
आकर्षण वाटायचे...
डॉक्टरांच्या दोन्ही
कानात आणि पेशंटच्या
छातीवर, पाठीवर
ठेवून काय तपासायचे
डॉक्टर?
वाटायचे काही मनातले तर
कळत नसेल ना यांना?
जसजसे मोठे झालो
स्टेथस्कोपचे महत्त्व कळत गेलं
आता परत एकदा वाटतं...
कोरोना आणि स्टेथस्कोप
यांचं नातं दृढ आहे...
प्रत्येक कोरोनाबाधितांनी
देव बघितलाय स्टेथस्कोपवाल्या
डॉक्टरांमध्ये...