STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

4  

Yogita Takatrao

Others

सत्ता

सत्ता

1 min
158

नेहमीच देत राहिले 

प्राधान्य दुसऱ्यांना

आणि दाबून टाकलं

स्वतःच्याच भावनांना


इच्छा ही ठेवून दिल्या

बाजूला सारून

स्वतःला काय हवं ? 

ठेवलं त्याला बंदिस्त करून !


नेहमीची हां जी 

भाषा मनमानीची

अरे किंमत कुठे असते ? 

समोरच्या माणसांची ? 


सगळंच व्हावं फक्त 

मनासारखं माझ्या 

काय फरक पडतो ?

काय वाट्टेल मनास तुझ्या ?


जगा खुशाल मस्त

दुसऱ्यांच्या मनास मारून 

सत्तेच्या नावाखाली 

जिवंतपणीच टाकलं मारून 


मनात जे आहे 

ते ही नाही बोलायचं 

उचलायचा मुखवटा 

आणि हसत सुटायचं


खरं बोलायची 

सोय इथे नसते

खोट्या सोंगास 

किंमत फार असते !


Rate this content
Log in