STORYMIRROR

Madhuri Dashpute

Others

4  

Madhuri Dashpute

Others

स्त्री

स्त्री

1 min
506

ती स्त्री असते

जी कधी कन्यारत्न म्हणून

मातेच्या उदरी जन्म घेते

साता जन्माच पुण्य

तिच्या पदरात घालते

आनंदान सार घर भरून टाकते

मायेच्या ओलाव्यान दुःखावर सहज लिंपन घालते!


ती स्त्री असते

जी कधी सून म्हणून

घराची शोभा वाढवते

आईबापाचं घर सोडून

त्याच्यासोबत येते

परकं वाटणार घर सहज आपलं करून जाते

घरातल्या साऱ्यांना मायेन जवळ करते!


ती स्त्री असते

जी कधी सासू म्हणून

घर परंपरा जपते

आयुष्याच्या शेवटपर्यंत

घरादारासाठी राबते

कधी सासूपणाचा रुबाब झाडते

तर कधी मायेन हळवा स्पर्श करते!


ती स्त्री असते

जी कधी आई म्हणून

फुलासारखं आपल्या बाळाला जपते

न मापता येणारी सुख

त्याच्या ओंजळीत भरते

निःस्वार्थ माया करून

आपल्या लेकरांवर ममतेची छाया धरते!


ती स्त्री असते

जी कधी बायको म्हणून

लक्ष्मीच्या रूपात घरचा उंबरा ओलांडते

सर्व संकटात सदैव साथ देते

पतीची छाया होऊन

त्याला सदैव धीर देते

संसार फाटका जरी असला

तरी सांभाळूनच नेते!!!!...


Rate this content
Log in