STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

3  

Sunita Anabhule

Others

"स्त्री", कविता प्रेरणा, ती

"स्त्री", कविता प्रेरणा, ती

1 min
586

कविता शिकवून गेली......


ती माझ्या जीवनात आली,

सुख-दुःखाची जाणीव झाली,

भावना व्यक्त होवू लागली,

"स्व" ची जाणीव मला झाली, कविता मला शिकवून गेली......


बालपणीची अल्लड नाती,

परंपरांची जोखडं माथी,

भल्या बुऱ्या ची नसे गती,

सन्मार्गाच्या रस्त्यावरी ती भेटली, कविता मला शिकवून गेली........


शालेय जीवनात प्रार्थना आली,

बडबड गीतांचा नजराणा झाली

तारुण्यात शृंगाराने प्रेमात न्हाली,

अश्लील,असभ्यतेची सीमा झाली, कविता मला शिकवून गेली......


अशी माझी कविता

माझी जीवनसरीता,

जीवन संगीत शिकवून गेली,

कविता मला शिकवून गेली, कविता मला शिकवून गेली.........



Rate this content
Log in