STORYMIRROR

Rajesh Sabale

Others

4  

Rajesh Sabale

Others

स्त्री एक प्रेरणा

स्त्री एक प्रेरणा

1 min
511

काळालाही मिठीत घेण्याची, जिच्यात जिद्द आहे।

अशा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।धृ।।


आई असो की, बहीण, बायको किंवा कोणाची सून आहे।

संकटात सापडलेली महिला, कोणाची तरी मुलगी आहे।।

मेणासारखी मऊ असली, तरी वाघाचं काळीज आहे।

सुख-दुःखातही, संसार करण्यात, तिची धमक आहे।।

त्यांच्याच झिजण्यात, अगरबत्तीचा सुवास आहे।

अशा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।१।।


दुष्काळ असो की, दारिद्र्य, कधी सुखाचा क्षण आहे।

दुष्काळाच्या भयानकतेतही, लढण्याची ताकद आहे।।

कोणा आत्महत्या करणाऱ्या, बळीराजाची बायको आहे।

त्याच्याच मुलांची माय होऊन, ताठ मानेनं जगत आहे।।

महापुरात झाडे गेली, ती लव्हाळ्यासारखी उभी आहे।

अशा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।२।।


वासनांधांवर प्रेम करते, हेच तिचं अपयश आहे।

संस्काराच्या ओझ्याखाली, अजून ती दबली आहे।।

आता तर जन्म देणाराच, तिचा बळी घेत आहे।

आईच्या उदरातच, जीव तिचा गुदमरतो आहे।।

तरीही अजून ती काळाच्या एक पाऊल पुढे आहे।।

अशा स्त्री शक्तीला माझा, मनोमन सलाम आहे।।३।।


Rate this content
Log in