सरळ शब्दात मांड वेदना
सरळ शब्दात मांड वेदना
1 min
198
नको घेऊस आढेवेढे
सरळ शब्दात मांड वेदना
जगण्याच्या या वाटेवर
विसरू नकोस संंवेदना
पावलांना नको थांबवूस
शोधू दे वाटा नव्या
कल्पनांचे बांंधून मनोरे
जागा नव्या गाजवाव्या
अपयशाचा नको वावर
ठेेेव सकारात्मक नजर
यशाची शिखरे गाजवून
करावा विजयाचा जागर
