सरिता
सरिता

1 min

213
पर्वतराजींची कन्या
वाहे आपुल्या मस्तीत
अवखळ खळखळ
नाद निर्मिते गतीत
घर पित्याचे सोडूनी
धावे डोंगरउतारी
सवे घेऊनी संपत्ती
संथ हो पठारावरी
विस्ताराने समृद्धसा
करी प्रांत तीरांवरी
जल विपुल जनांसी
दान देई जलदात्री
घेई सवे भगिनींना
जाई पुढे मोदभरे
मिळे सागरा सरिता
होई मीलन प्रेमभरे