स्री भ्रूण हत्या ( कविता )
स्री भ्रूण हत्या ( कविता )
1 min
3.0K
समाज मानसिकता
आजही बदलत नाही
स्त्री भ्रूण हत्या या
येथे थांबतच नाही....
असे जरी कायदा
धाक त्याचा नाही
लपुन छपुन पहा
धंदा रोखत नाही....
स्त्रीची विविध रूपे
कोणी नाकारत नाही
स्वागत स्त्री जन्माचे
कोणी करत नाही.....
व्यवहार येथे पैशाचा
भ्रूण ओळखत नाही
खरेपणा डॉक्टरांचा
कधी पडताळत नाही.....
बिघडले समाजस्वास्थ
लक्षात घेत नाही
स्त्री पुरुष जन्मदर
तफावत कमी नाही...
मातृत्वाचा राखा मान
स्त्री गुलाम नाही
अधिकार तीला घटनेत
मनुस्मृती आता नाही....
