सर वळवाची
सर वळवाची
1 min
200
येता सर वळवाची
दरवळे मृदगंध
टपटप गारा वर्षाव
दाटे अपार सुगंध
उष्मा जाई पळूनीया
गार वा-याची झुळुक
सुख दाटे मनोमनी
दावे निसर्ग चुणुक
थंड गारा वेचताना
पावसात भिजताना
पटपट वेचताना
ओंजळीत ठेवताना
गार आसमंत सारा
येई सुखद गारवा
आला पाऊस पाऊस
सर्वांनाच हवाहवा
