स्पर्श
स्पर्श

1 min

12K
तहानेने व्याकूळ झालेल्याला पाण्याचा होणारा स्पर्श
नवजात बालकाला आईच्या मायेचा होणारा स्पर्श
पिल्लांना चोचीत दाणे भरवताना पक्ष्यांना होणारा स्पर्श
शेतकऱ्याने त्याच्या हिरव्यागार पिकांना केलेला स्पर्श
भुंग्याने रंगबिरंगी फुलाला केलेला नाजूक स्पर्श
दवबिंदूंचा पानांना होणारा अलगद स्पर्श
पावसाच्या पाण्याचा तप्त धरतीला होणारा स्पर्श
मंद वाऱ्याचा कातरवेळी प्रेयसीला होणारा स्पर्श
स्पर्श ओलाव्याचा
स्पर्श मायेचा
स्पर्श प्रेमाचा
स्पर्श काळजीचा