सोनसकाळ
सोनसकाळ
1 min
556
रम्य नभी उषःप्रभा
रवि उगवे गगनी
सोनप्रभा हळदुली
तेजोनिधी रथातुनी (१)
वृक्ष वेली सोनसळी
गेल्या रंगात रंगूनी
फुले सोनेरी पिवळी
मोहरती रानीवनी (२)
निघे बैलगाडीसवे
रामपारी हलधर
तालावरी घुंगरांच्या
वाट चाले सरसर (३)
वृद्ध बसे पारावरी
घेत प्रभूनाम मनी
करी वंदन सुर्व्याला
सुखी ठेव दिनमणी (४)
कानी बांग कोंबड्याची
लगबग गृहिणींची
ओवीसंगे गाई जाते
दारी शोभा रांगोळीची (५)
रम्य उषःकाली शोभा
मंद झुळुक वा-याची
मन धावे गावाकडे
ओढ उसळे गावाची (६)
