सोनपावलांची गौराई
सोनपावलांची गौराई
1 min
196
आल्या आल्या गौरीबाई
सोनपावलांनी येती
आरती गं ओवाळिती
सुवासिनी (1)
आल्या माहेरवाशणी
भाग्यवान सुवासिनी
अंगभर दागिन्यांनी
मढलेल्या (2)
नवी कोर चंद्रकळा
तेज मुखी कुंकू भाळा
साज बोरमाळ गळा
शोभतसे (3)
झिम्मा फुगडी खेळती
नवे उखाणे घालती
हसतखेळत गाती
गोड गाणी (4)
नानाविध फुले माळे
चिंचा बोरे नि आवळे
गंध गोड दरवळे
पक्वान्नांचा (5)
महालक्ष्मी आगमने
घर भरे प्रकाशाने
भाग्य लक्ष्मीप्रसादाने
उजळते (6)
