सोनकिरणे
सोनकिरणे
1 min
434
ऊन हे कोवळे
अंगावर पडे
प्रभात समयी
कैफ मज चढे
भास्कर तो आला
उम्मेद घेऊन
अंधाऱ्या रातीला
तो मात देऊन
पाहुनी सोनेरी
हे सोनकिरणे
विसरलो आता
दुःखात हरणे
कधी तो शीतल
कधी वाटे तप्त
ह्या जीवसृष्टीला
चालवतो गुप्त
त्याच्याविना सांगा
काय शक्य इथे
नांदते मांगल्य
तो जाईल तिथे
