STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

2  

Abasaheb Mhaske

Others

सोनेरी पर्व पुन्हा येणे नाही

सोनेरी पर्व पुन्हा येणे नाही

1 min
240

माणूस शिकला पण सुशिक्षित नाहीच होऊ शकला 

भौतिक सुखांनी पुढारला पण माणुसकी हरवून बसला 

घड्याळाच्या काट्यावर नाचणारा बोलका बाहुला झाला

यंत्रयुगात स्वतःच एक सवेन्दनाहीन यंत्र होऊन बसला ...


उध्वस्त भावनांची स्पंदने, निर्विकार चेहरा, हतबल

आत्मकेंद्रित होऊन हरवून बसला शांतता, सौख्य

 मागे वळूनी पाहता हाती काही आल्याचे जाणवत नाही

खूप समजावलं मनाला तरी जगणं सालं राहूनच गेलं वाटतं 


पूर्वी पैसे अडका आर्थिक सुबत्ता नव्हती तरी ...

तीन - चार पिढ्या एकत्र सुखानं नांदायाच्या

भांडण तंटे , वाद विवाद व्ह्याचे पण क्षणिकच

काहीही म्हणा पण ते सोनेरी पर्व पुन्हा येणे नाही


व्यवहारी जगात आदर्शवादी वेडाच ठरतो आहे

जो तो आपल्याच पात्रांवर भात ओढतो आहे 

सोन्यासारखी माणसं हल्ली नाही सहसा भेटतं

आत्म्यावाचून धड सारी जणू भावनाशून्य प्रेतं


पैसे संपत्ती कमवता येते पण प्रेम ,आपुलकी नव्हे

अक्कल कुठे विकत मिळते ? संस्कार ही नव्हेच नव्हे

सॊडूनी सारे एक होऊया रे जात, धर्म नि हेवे- दावे

अंती काही नव्हेच येणार, हाती आपुल्या किर्तीरुपी उरावे ....


Rate this content
Log in