STORYMIRROR

Chandan Pawar

Others

4  

Chandan Pawar

Others

सोहळा

सोहळा

1 min
23.8K

राजधानी किल्ले रायगडी

थाटला शिवराज्याभिषेक सोहळा ;

भारतवर्षी कीर्ती पसरली

आमंत्रण दिले सकाळा .


स्वराज्यनिर्माता राजा बसता

होणार पुण्यशील तख्त ;

रणमर्द- रणझुंजार लौकिक

अविष्कार अवतरणार कुलवंत .


नवी राज्यव्यवस्था, नवे कालगणन

नवे प्रयोजन नवे राजकारण ;

नवे शिवमुद्रा चलन नवे अष्टप्रधान

नवे रितीरिवाज नवे राजसिंहासन .


रानफुले -सुगंधी पुष्पांनी माळांनी

रायगड किल्ला सजला ;

तुतारी -ढोल -नगाऱ्यांनी

सारा आसमंत दणाणला .


महादरवाजा ,प्रशस्त दालने ,

वाडे दीपमाळ पेटले ;

स्वराज्यातील प्रजेचे चेहरे

आनंदाने उजळले .


घोडे- हत्ती- उंट

झुल-झालरीणी सजले ;

स्वादिष्ट मिठाई -फळांना

राजतबक भरले .


बत्तीसमणी राजसिंहासन

एकटक पहात होते राजांकडे ;

उदंड यश -आयुष्य लाभो

हेच जगदीश्वराला साकडे .


छत्रपती शिवाजी महाराज

राजसिंहासनावर आरूढ झाले ;

आनंदोत्सवाला उधाण येऊन

शिवशाहीचे पोवाडे गाजले .

                         


Rate this content
Log in