सोडलेली वाईट सवय
सोडलेली वाईट सवय
1 min
325
सतत मालिका बघता बघता
दूरदर्शनची लागली वाईट सवय
कामे भराभर उरकून टी व्ही समोर
सतत बसायची लागली सवय
एकापाठोपाठ एक मालिका बघताना
माझे भान हरपायला होई
त्या दुष्टचक्रात अडकताना
मी आधिकाधिकच खेचली जाई
डोळे चुरचुरु लागले अन्
चष्म्याचा वाढला नंबर
तेव्हा कुठे जाग आली
दूरदर्शनला द्यावे अंतर
जाणीवपूर्वक मालिका घटवल्या
ठराविक वेळच ठरवली
आरोग्याकडे लक्ष देऊन
टी व्हीची सवय सोडली
