संवर्धन
संवर्धन
1 min
259
थेंब थेंब पाण्याचा
प्रत्येकाने वाचवावा
निसर्ग संवर्धनाचा
झेंडा तुम्ही नाचवावा॥१॥
काँक्रिटच्या जंगलाची
हाव आता द्या सोडून
निसर्गाशी तुटलेली
नाळ आता घ्या जोडून ॥२॥
मोकळ्या हवेत मिळेल
मुबलक प्राणवायू
प्रदूषण ठेवा दूर
वाढेल तुमची आयू॥३॥
हातभार सारे लावू
जतन करण्या सृष्टी
अंधश्रद्धा दूर सारा
उघडी ठेवत दृष्टी॥४॥
जपावे वनसंपत्ती
यात लपला खजिना
वन औषधींचा इथे
लाभे बहुमोल दागिना ॥५॥
वन्य प्राण्यांचा राखावा
अधिवास अबाधित
अथवा होईल सारे
जगणे तुमचे प्रभावित॥६॥
