संवेदना...
संवेदना...
1 min
186
जगास सार्या आज
फुलाने सुगंध वार्यातून दिला
पण हाती माझ्या असुनही
तो मलाच गंध देण्या विसरला...
कळीस पहाटे जागवले
देऊन स्पर्श अलवार हातांचा तिला
पण हाती माझ्याच काटे टोचले
अंतरातून मी होते जपले जिला...
पाकळ्यांनाही वेचले
तुटून फुलातून ज्या खाली पडल्या
पण वेचूनही त्यांना मी
हातात माझ्या त्या नाहीच दरवळल्या...
कोण जाणे काय झाले
आज बागेतल्या कळ्याही रुसल्या
पण नाहीच कळले मला
लावला जीव तरीही त्या अश्या का हिरमुसल्या...
