STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

संत

संत

1 min
326

पैठण निवासी गोदावरी तीरी

विठ्ठल श्रीहरी नांदतसे


संत भानुदास महासज्जन 

करितो कीर्तन वैष्णवांचे


एकनाथ नामे त्यांचाच वंशज

श्री हरी अंशज भक्ती करी 


नित्यनेम पूजा भजन कीर्तन

आणि प्रवचन  सांगतसे 


वैष्णवांचा धर्म अस्पृश्य अकर्म

भागवत मर्म सांगी लोका


अद्वैत सिद्धांत आहे चराचर 

पंचभूत सार मांडलासे


एकच सजीव नांदती सकळ 

त्याचा ताळमेळ जीवा लागी


आत्माच शाश्वत नांदे त्या घरात

श्री हरी दारात सर्व एक 


कथा निरूपण अभंग गौळण 

केलेसी तारण जगउद्धारा 


एकनाथी कीर्तन रचले भारुड 

मांडले गारुड जगासाठी


जातपात भेद नासवी मंगल

जीव अमंगल नाही कोणी


धर्म कर्म सार केले प्रबोधन

अस्पृश्य बंधन नष्ट केले


साक्ष्यात श्रीहरी श्रीखंड्या बनुनी

घरी भरे पाणी एकनाथी


ऐसा पुण्य संत लाभला पैठणी 

गोदेच्या विराणी एकरूप


Rate this content
Log in