संत श्री सेवालाल महाराज
संत श्री सेवालाल महाराज
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
383
संत सेवालाल महाराज सतगुरु
शूरवीर बंजारा समाजाचे
भीमासिंह धरमणीमाता होते
जन्मदाते थोर क्रांतिकारकाचे.....१
मानवतावादी संतरूपाने झाले
जगतप्रसिद्ध संपूर्ण जगतात
पर्यावरणरक्षण व गोरक्षणाची केली
जागृती समाजात व परिसरात.......२
निजामाविरूद्ध लढा उभारुन
केले महान कार्य धर्मरक्षणाचे
अनिष्ट रूढ़ी,परंपरा मोडीत काढल्या
शोषणाविरूद्ध करुन जन मन जागृतीचे.....३
आग्रही भूमिका घेतली
प्रत्येक क्षणी समाजसुधारणेसाठी
झटले संपूर्ण आयुष्यभर
समाजघटकांच्या उन्नतीसाठी.....४
समाजाने शिक्षित होऊन
प्राप्त करावे राजवैभव
संकटसमयी कामा येतात
पाठीशी असलेलेच अनुभव....५