STORYMIRROR

Eshawar Mate

Others

2.5  

Eshawar Mate

Others

संत सांगतो

संत सांगतो

1 min
15.7K


नाही धर्म, नाही जात, ना मी पंथ सांगतो।

तूका-तूकडोजी,गाडगेबाबा संत सांगतो।।

ज्ञानदीप कीर्तनातले संत नामदेवजी

अज्ञान समाजाचा खरा अंत सांगतो।।

लढले संत ज्या विरुद्ध,समाज सुधारन्याला समाजात दडलेला तो शोषक जंत सांगतो।।

आंधळ्या हरेक भक्ताला संत मार्ग दिसेना 

भोंदू बुवांच्या पायी तो लीन,खंत सांगतो।।

बुडाला कार्यभाग जो बिसंबे भोंदूवरी पाखंड खंडने आम्ही तंतोतंत सांगतो।।

बिन बुडाच्या लोट्याला नसते ठहराव

अभंगातली चेतना मी अनंत सांगतो ।।

वारकरी शिवकवी ध्येयासक्त अनुयायी

पचवीले सत्य ज्याने तो गुणवंत सांगतो।।


Rate this content
Log in