संसाराचे मर्म
संसाराचे मर्म
1 min
135
मर्म सुखी संसाराचे
जाण खरे मनी बाळे
सुखी रहा तू संसारी
मने नीट सांभाळ गे!! (1)
उपदेश दिला कोणी
प्रत्येकाला मान द्यावा
नको देऊ प्रत्युत्तर
मनी संयमची हवा (2)
नवखीच तू नवरी
अनुभव ना पदरी
कला माणसे जोडणे
शब्द जपून वापरी (3)
रथ संसाराचा नीट
दोघे प्रेमाने चालवा
गुंजारव प्रेमभरे
हर्ष द्विगुणित व्हावा (4)
मर्म पूर्ण ओळखूनी
गोफ नात्यांचे गुंफावे
माया प्रेम स्नेहभरे
नाव जगी मिळवावे (5)
