संसार
संसार
1 min
281
स्त्री पुरुष
संसाराची चाके ती
सुजन सांगती
अनुभवे.............१
झाला वाद
एकाने राखावी शांती
सुखी संसाराची
गुपिते................२
तुझे माझे
उगाच का करती ?
गोडी साखरेची
दुधामधे..............३
वृत्ती समाधाने
सदा जी ठेवती
संसार करती
सुखाने..............४
