सणाची आठवण
सणाची आठवण
1 min
494
सण म्हटल्यावर मला
दसराच आठवतो
त्या दिवशी माझा
वाढदिवस असतो
शाळेत पाटीपूजन
नटूनथटून जायची
नवा फ्राँक, पाटी
अन् पिशवी खाऊची
सर्वांना गोळ्या वाटताना
खूप छान वाटायचे
कधी कधी कुणी
दोनही मागायचे
शाळेत वाढदिवसाचे
सुरेख पत्र मिळायचे
गोड जेवण झाल्यावर
पत्र मन लावून वाचायचे
संध्याकाळी भोंडल्याला
सर्वजणी जमायच्या
खिरापती ओळखण्यात
रंगून जायच्या
केळीच्या पानावर
दहा खिरापती
आई आग्रहाने वाढायची
मनात गोड आठवणी
