संकट
संकट
आवाज घोटून रडतोय, सारा गाव.
कसली ही येळ आली, हा काळ कुणा ठाव.
चल जरा सोबत, पानी तर दाव.
सोबतच मरतायत, रंक आणी राव.
मानस जनावर जमीन, कोरड पडली सगळ्याना.
झाडे तोडली निसर्ग कोपला, अक्कल आली पांगळ्यांना.
हळू हळू सगळ संपतंय, सगळ दिसतय डोळ्याला.
पानी आडवा पानी जिरवा, समजवा माझ्या बाळाला.
पळून जाण्यात अर्थ नाही, पाठलाग तो सोडणार नाही.
नसेल तेव्हा वाचवा असेल तेव्हा साचवा, दुष्काळ कधी थांबणार नाही.
लाऊ पुन्हा झाडे, संगोपू लेकराप्रमाण.
धरणीचे संकट होईल शांत, एका आई समान.
