STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

4  

Sunita Anabhule

Others

संक्रांत

संक्रांत

1 min
352

सण आनंदाचा । पहिला वर्षाचा ।

अवीट गोडीचा । राहो मनी ।। १ ।।


स्नेहाचा हा तीळ । भाजा खरपूस ।

डाळ खोबऱ्यास । भरडून ।। २ ।।


गुळाच्या पाकात। भरडा घालावा

हळूच वळावा । तीळ लाडू ।। ३ ।।


वैर द्वेष भाव । विसरुन सारे ।

जग जोडू यारे । मित्रत्वाचे ।। ४ ।।


जोड आनंदाची । गोडी या क्षणाची ।

गोडी लयलुटीची ।। चाखू या ना ।। ५।।


स्नेहाच्या तीळाचा । गोडवा गुळाचा ।।

घट्टश्या मैत्रीचा ।। फुलपंखी ।। ६।।


सण संक्रांतीचा । रुसवा फुगवा ।

मनाचा मिटवा । गोड हास्य ।। ७ ।।


असा गोड सण । जपूया आपण ।

पतंग होऊन । मनोमनी ।। ८ ।।


Rate this content
Log in