संकल्प
संकल्प
वर्षाच्या सुरवातीलाच
वजन कमी करायचे ठरवले
दृढ संकल्प मनात केला
त्याप्रमाणे आराखडे रचले
लवकर झोपून लवकर उठावे
गजरच लावून झोपे
सुरवातीला झोप आवरेना
काय करावे नकळे
गरम गरम खमंग पदार्थ
रोजच घरात असत
पण गोड तेलकट पदार्थ
मलाच वर्ज्य असत
सुरवातीला मन मारुन
तसेच घोडे दामटले
पार्टीतही कमी खाऊन
डाएट कायम ठेवले
सहा महिन्यांनी मला
दिव्य साक्षात्कार झाला
वजनकाटा चक्क
पाच किलोंनी हलला
पुढचे सहा महिने
अगदी घट्ट राहिले
आग्रह केला तरी
नाहीवर ठाम राहिले
वर्ष संपल्यावर बघते तर
चक्क दहा किलो कमी
मैत्रीणी म्हणाल्या मेंटेन कर
न वाढायची काय हमी
