संघर्षातली रमाई
संघर्षातली रमाई


दीन दलितांची माता
जनी रमाईची गाथा
दु:खी काळजा भिडली
रमा भिमाची ही वेथा
ओढ जीवा रमा तुझी
घामा कष्टाची शिदोरी
रमा भिमाची लाडकी
मृदु गंधाची कस्तुरी
सोसलेस दु:ख फार
रमा भिमाला आधार
ज्योती रमा प्रकाशाची
भिम लेखणीची धार
धार धार कलमाची
शाई रक्ताची रमाई
धन्य तुझे उपकार
दीन दलितांची आई